Wednesday, December 26, 2007

माळणगाठ


माळणगाठ
(
छायाचित्रासाठी आभार :http://commons.wikimedia.org/wiki/Image:Dievenknoop.svg)
रायगडावरच्या श्रीजगदीश्वरमंदिरापुढे असलेल्या दगडी नंदीच्या पाठीवर जी झूल कोरलेली आहे त्या झुलीत नंदीच्या पाठीवर विशिष्ट प्रकारची गाठ येते. ह्या गाठीला मराठीत माळणगाठ असं नाव आहे. दि. २५ डिसेंबर २००७ ह्या दिवशी रायगडावर मंदिरात दर्शनाला आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने गाठीचं हे नाव सांगितलं. अशी अन्य गाठींची मराठी नावंही गोळा करायला हवीत. आपणच आपली संपत्ती अशी दुर्लक्षणं बरं नव्हे.