Wednesday, October 24, 2007

मराठी शब्दसंपदा

मराठी शब्दसंपदा

इंग्रजी संज्ञा : बुलडोझर

शाव्यकोतला पर्याय : बलीवर्द यंत्र
मुळच्या इंग्रजी संज्ञेतल्या शब्दघटकांचं भाषान्तर. मुळात बलीवर्द हा शब्द सहज कळणारा नाही. इंग्रजी लोक जे रूपक वापरतात तेच आपण वापरायला हवं असं नाही.

आपला पर्याय : मोडगाडा
ह्या गाड्याच्या अनेक उपयोगांपैकी एका उपयोगाचा निर्देश ह्या संज्ञेने होतो. अनावश्यक रूपक टळतं.

2 comments:

xetropulsar said...

नांगरगाडा, मोडगाडा दोन्ही शब्द आवडले.

आपली अनुदिनी उत्तम आहे.

फक्त एकच तक्रार - आपण नेमाने लिहित नाही. त्यामुळे लेखांकडे इतर अनुदिनीकारांचे दुर्लक्ष होत असावे.

सुशान्त said...

आपली तक्रार खरी आहे. नेमाने लिहिलं पाहिजे. पण लिहिण्यापेक्षा वाचण्यात, समजून घेण्यात बराच वेळ जातो. लिहिणं राहून जातं. आता मात्र पुन्हा नेमाने लिहिण्याचा प्रयत्न करीन.